कोर्टाचा आदेश झुगारून अवैध बांधकाम

0
101
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा
कोर्टाचा मनाई आदेश झुगारून कुठलीही परवानगी न घेता रामअवतार नावधंर बांधकाम करीत असून पोलीस प्रशासनास बांधकाम बंद करण्याचे कोर्टाचे पत्र असतांनाही पोलीस प्रशासन बांधकाम बंद करण्याऐवजी कोर्टाचा स्पष्ट आदेश नाही बांधकाम प्लाट क्रमांक १४ वर सुरु आहे आम्हाला काही करता येणार नाही पोलीस बांधकाम थांबविणार नाही नांदा ग्रामपंचायत संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यास असहकार्याची भुमिका घेत असल्याने नांदा ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर आमरण उपोषणास बसल्या आहेत कोर्टाच्या आदेशाचे अमलबजावणी करणार तरी कोण असा गंभीर प्रश्न इथे निर्माण झाला असून राजकिय दबाब असल्यानेच प्रशासनिक अधिकारी कारवाई करीत नसल्याचे दिसते

नांदा ग्रामपंचायतमध्ये अनेकजण अतिक्रमण करुन बांधकाम करीत आहे एकाने तर चक्क नालीवर शौचालय बांधले तर सार्वजनिक शौचालयामागे शासकिय जागेवर डुक्कर पोसण्याकरीता पक्के बांधकाम केले आहे उपसरपंच यांनीच रस्त्यावर दुकानाचे गाळे उभारल्याच्या अनेक तक्रारी आहे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी , तहसिलदार यांचेकडे अतिक्रमणाच्या तक्रारी करुन कारवाई करण्याऐवजी संरक्षणच मिळत असल्याने नावधंर यांच्या अनधिकृत बांधकामाचा विषय जिल्हा न्यायालयात पोहचला कोर्टाने मनाई हुकुम दिला पोलीसांना कारवाई करण्याचे आदेशही केले आहे राजकिय पाठबळ धनबल असल्याने न्यायालयाचा आदेश झुगारून मुजोरीने बांधकाम सुरुच असून दोन दिवसात स्लॅब टाकून बांधकाम उरकून घेण्याची घाई नावधंर यांना लागली आहे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने दिनांक २८ आगस्ट रोजी महिला ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर ग्रामपंचायत नांदाचे प्रवेशाव्दारा समोर आमरण उपोषण बसल्या आहेत माजी सरपंच घागरु कोटनाके , माजी उपसरपंच बंडु वरारकर , मारोती बुडे , संजय नीत , चंद्रशेखर राऊत , हारुण सिद्दिकी , राजु मोहीतकर यांची उपस्थिती होती न्याय कुठे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे .

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here