सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन शासनाच्या नियमांच्या अधीन राहून करावे – जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ रेड्डी

0
140
Advertisements

चंद्रपूर – राज्यातील कोरोना महामारीच रौद्र रूप बघता यावर्षी उत्साहात साजरे होणारे सण साधेपणाने साजरे होणार अशे आदेश प्रशासनाने दिले आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, गणेशोत्सव मध्ये नागरिकांना विविध रोजगार उपलब्ध होतो परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव बघता यंदाचे गणेशोत्सव व अनंतचतुर्दशी सुद्धा साध्या पणात साजरे करा असे आदेश प्रशासनाने दिले आहे.
अनंतचतुर्दशीला श्री गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात येते परंतु यंदा मिरवणुकीला परवानगी नाही, व विसर्जन हे कृत्रिम तलावात करावे, विसर्जन करते वेळी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
मागच्या वर्षी 1578 सार्वजनिक गणेश मंडळांनी जिल्ह्यात मूर्ती स्थापन केल्या होत्या यावर्षी 853 सार्वजनिक गणेश मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहे, सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करून श्री गणेश विसर्जन करावे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ रेड्डी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here