Advertisements
चंद्रपूर – रॉकेट म्हटलं की आश्चर्य वाटून घेऊ नका हा आकाशात उडणारा रॉकेट नसून देशी दारुवाला रॉकेट आहे, चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अवैध दारूचा व्यवसाय जोमात सुरू आहे, दारूबंदी नंतर जिल्ह्याचे चित्र बदलले परंतु अवैध दारू ने हाहाकार माजविला.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना एके ठिकाणी आयशर ट्रक व कार उभ्या अवस्थेत पोलिसांना आढळली त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता त्या वाहनात देशी दारूच्या तब्बल 100 पेट्या आढळून आल्या, पोलिसांनी सर्व माल जप्त करीत 2 आरोपीना अटक केली असून एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोरोना काळातील लॉकडाऊन मध्ये जिल्हाबंदी असताना जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात दारू येते कशी हा तर निरुत्तर असलेला प्रश्न आहे.
ही कारवाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बहादूरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.