गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूरचा राजा गणेश मंडळातर्फे योद्धा डॉ.सुनील टेकाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याआधी डॉक्टर टेकाम यांनी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्य केले.तसेच सध्या ते वरोरा येथील रुग्णालयात कार्यरत होते.कोरोना रुग्णांची सेवा करताना त्यांना कोरोना साथीने ग्रासले.चंद्रपुरात कोव्हिट केअर सेंटरला उपचार घेत असताना त्यांचे दु:खद निधन झाले.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.या परिस्थितीत परिवर्तन बाप्पा हा विधायक सामाजिक उपक्रम गडचांदूरचा राजा गणेश मंडळातर्फे राबविण्यात येत आहे.यामाध्यमातून अनेक गरजूंना प्रत्यक्ष मदत दिली जात आहे.तसेच विघ्नहर्ता म्हणून ओळख असलेल्या बाप्पाने कोरोनाचे हे विघ्न दूर करावे अशी प्रार्थना केली जात आहे.याअनुषंगाने येथील गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने कोरोना योद्धा डॉ.सुनील टेकाम यांना श्रद्धांजली अर्पण केली.त्याचप्रमाणे कोरोना संकटात अनेक डॉक्टर्स,पोलिस,आरोग्य कर्मचारी आदींना जीव गमवावा लागला.त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना गणेश भक्तांनी बाप्पाच्या चरणी केली. गडचांदूरचा राजा गणेश मंडळाचे सचिन सातभाई,अभिलाश तुराणकर,शुभम कातकडे,देवेंद्र मून,महेश झाडे,चेतन सौताने,मंगेश कवलकर,सारंग मेंढी,सुनील बुटले,सचिन जनाले,महादेव हेपट आदी सदस्य उपस्थित होते.
डॉ.सुनील टेकाम यांच्यासह वीर मरण आलेल्या “कोरोना योद्धांना” श्रद्धांजली
Advertisements