Advertisements
गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जनावरांवर ओढवलेल्या लम्पी स्कीन डिसीज रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण शिबिर आयोजन केले जात आहे.याच पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोडापे यांच्या पुढाकाराने 25 अॉगस्ट मंगळवार रोजी सकाळी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जनावरांवरील आजारावर आळा बसावा तसेच याची लागण इतर जनावरांना होऊ नये यामागचं उद्देश.शिबिरात 185 बैल व 35 लहान गुरांवर लसीकरण करण्यात आले.”पशुधनाच्या संवर्धना विषयी जास्त खबरदारी घेत पशुपालकांनी वेळोवेळी लसीकरण करावे” असा मोलाचा सल्ला डॉ.शेंडे यांनी यावेळी दिला.सरपंच प्रमोद कोडापेसह उपसरपंच शिवाजी बोढे,ग्रामपंचायत सदस्य रविंद्र आत्राम,पशुधन पर्यवेक्षक डॉ. शेंडे,डॉ.ठाकरे,डाखरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.