चंद्रपूर@1799 चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाचा उद्रेक

0
127
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1799 झाली आहे. यापैकी 1081 बाधित बरे झाले आहेत तर 696 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

गुरुवारी एकूण 132 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात पुन्हा 2 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला, त्यापैकी चंद्रपूर शहरातील पठाणपुरा वार्डातील 60 वर्षीय नागरिकाचा कोरोनाने 27 ऑगस्टला मृत्यू झाला, तर बल्लारपूर येथील मौलाना आझाद वार्डातील 52 वर्षीय नागरिकाचा 26 ऑगस्टला मृत्यू झाला, दोन्ही मृतकाना कोरोनासह श्वसनाच्या आजारासह न्यूमोनिया व मधुमेह होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 19 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here