Advertisements
चंद्रपूर – विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करा अशी मागणी पालकांनी महर्षी विद्या मंदिर शाळेला निवेदन देऊन केली आहे.कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती.त्यानंतर व्यावसायिक, कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला.तसेच सर्वसामान्य नागरिकांवर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले.अशा परिसथितीत मुलांच्या शाळेची फी भरणे शक्य नाही.काही व्यवसाय बंद पडल्याने पालकांसमोर बेरोजगारीची समस्या उदभवली आहे.हि सर्व परिस्थिती लक्षात घेता महर्षी विद्या मंदिर शाळेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करावी अशी मागणी पालकांनी महर्षी विद्या मंदिर शाळेला निवेदन देऊन केली आहे.