चंद्रपूर – मागील 1 वर्षांपासून, चंद्रपूर जिल्ह्यात हिंस्त्र जनावरांच्या(वाघ, बिबट, अस्वल) हल्ल्याचे प्रमाण वाढले असून, त्यात निर्दोष व्यक्ती, जनावरांचा हकनाक बळी गेलेला आहे. यात प्रामुख्याने, शेतकरी, गुराखी, बैल, म्हशी यांना भक्ष्य बनविले जात आहे. चंद्रपूर येथिल उर्जानगरातील, पर्यावरण चौक इथे दिनांक 26 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 च्या सुमारास बिबट्याने 5 वर्षीय मुलीवर हल्ला करून तिला ठार केले तसेच पोळा सणाला सुद्धा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून (राजुरा वनपरिक्षेत्रात) ठार केले.
राजुरा वनपरिक्षेत्रात , (कवीठपेठ, चिंचोली,सुबई )सुद्धा वाघाने बैल, म्हशींना हल्ला करून ठार केले आहे( दोन्ही घटना दोन-चार दिवसांत घडल्या)तसेच जिवती तालुक्यातील टेकामांडवा इथे वाघाच्या हल्यात बैल ठार झाला आहे.त्यामुळे लोकांमध्ये भिती असून यापुढे सुद्धा मानव-वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उर्जानगर हा चंद्रपूर शहराला लागून असून, शहरातील लोक महाऔष्णिक विद्यूत केंद्रात रोजगारासाठी जाणं-येणे करतात. कालच्या घटनेने त्यांना सुद्धा कामाला जाण्यास भीती वाटत आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण चंद्रपूर वनपरिक्षेत्र, तसेच राजुरा वनपरिक्षेत्र वनविभागाची गस्त वाढवावी तसेच वाघ, बीबट यांना जेरबंद करावे अन्यथा शरद पवार विचार मंच तर्फ तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच आपण केलेली कार्यवाही कळवावी, ही विनंती.