प्रशासनापुढे सत्ताधारी झाले हतबल

0
91
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठे शहर गडचांदूर नगरपरिषदेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीची सत्ता असून नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या सौ.सविता टेकाम तर राकाँचे शरद जोगी उपाध्यक्ष पदी विराजमान आहे. सत्तास्थापनेला 8 महिन्यांचा कालावधी लोटत आहे अजूनही सत्ताधारी प्रशासनावर वर्चस्व प्रस्थापित करू शकले नाही ही वास्तविक्ता नाकारता येत नाही. शहर विकासाची तळमळ असलेल्या काही नगरसेवकांना मुख्याधिकाऱ्यापुढे बोलण्याची, विषय मांडण्याची मुभा नसून चक्क कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती आहे. एकुणच “प्रशासनापुढे सत्ताधारी हतबल” असे चित्र निर्माण झाले असून प्रभागात अस्वच्छता पसरली असताना नगरवासी बोंबाबोंब करत आहे मात्र नगरसेवक इच्छा असूनही काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती पहायला मिळत असून “अरे देवा!गडचांदूर नगरपरिषदेत नक्की चालले तरी काय” अशी म्हणण्याची पाळी आली आहे.शहरासह विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांच्या प्रभाग क्रमांक 1 व 2 येथे पसरली अस्वच्छता पाहून यांनी शासनप्रशासन विरूद्ध निषेध करण्याचे ठरविले.याचा धसका घेत नगराध्यक्षांनी 24 अॉगस्ट रोजी दुपारी तडकाफडकी सत्ताधारी नगरसेवकांची बैढक आपल्या कक्षात आयोजीत केली.मुख्याधिकारी यांनाही बोलवण्यात आले.यात शहरातील विकास काम व स्वच्छतेवर चर्चा सुरू असताना असे काही घडले की मुख्याधिकारी चक्क एका नगरसेवकावर चिडून कक्षेतून निघून गेल्या. यानंतर लगेच त्यांनी नगराध्यक्षाला एक पत्र पाठवले “तुमच्या नगरसेवकांनी सर्व सत्ताधाऱ्यांपुढे माझा अपमान केला,त्यांना समज घालावी आणि भविष्यात आपल्या कक्षात सर्वांसमोर अशी अपमानजनक वागणूक माझ्यासोबत घडणार नाही याची दक्षता घ्यावी” अशी जणू तंबीच दिली. जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांनाही पत्र पाठवले.
नगराध्यक्षांनी सुद्धा मुख्याधिकाऱ्यांच्या या पत्राच्या उत्तरार्ध “आपण माझ्या बोलविण्यावरून माझ्या कक्षात स्वच्छता विषयी चर्चेसाठी आल्या.आरोग्य सभापतींनी शहरात होत असलेल्या आरोग्य विषयक गैरसोय,सफाई कर्मचारी व कोविड सेंटर आणि कॉरेंटाईन सेंटर येथील गैरसुवीधे बाबत चर्चा केली.आरोग्य व स्वच्छता समिती सदस्य असलेल्या एका तरूण नगरसेवकांने आपल्या आरोग्य व स्वच्छता विषयक समस्या सांगण्याचा प्रयत्न केला असता आपण त्यांना बोलू दिले नाही.”मी सभापतींशी बोलणार आपण नगरसेवक आहात” असे शब्द वापरले.सदरचे बोलणे हे लोकप्रतिनिधी नगरसेवकांचा अपमान असून लोकनियुक्त नगरसेवकांना आपल्या समस्या मांडण्याचा पूर्ण अधिकार लोकशाही मध्ये आहे.तसेच आपण आमच्या सर्वांच्या समोर एका तक्रारकर्त्याला जोरात बोलून अमानवीय वागणूक व पोलिसांची धमकी दिली.नगरसेवकांना बोलू न देणे व स्वतःच आवाज चढविणे हे संसदीय परंपरेला अनुसरून नसून आपली वागणूक बेजबाबदार आणि एका अधिकाऱ्याला शोभणारी नाही.प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण केलेले कृत्य योग्य नाही” अशाप्रकारे पत्राद्वारे कानउघाडणी केली. सोबतच याची माहिती जिल्हाधिकारी व पक्षाचे आमदार सुभाष धोटे यांना पत्राद्वारे दिली आहे.पत्रकार,प्रतिष्ठत वयोवृद्ध डॉक्टर,सर्वसामान्य नागरिक, विरोधी पक्ष नगरसेवकांना अपमानीत करत हिटलरशाहीचे दर्शन दिल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनाच विनाकारण धारेवर धरत असल्याचे चित्र असून “हे गणराया यांना सद्बुद्धी दे” अशी म्हणण्याची पाळी आल्याची उपहासात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.जिल्हाधिकारी याविषयी काय निर्णय घेणार हा मुद्दा शासकीय असून आमदार सुभाष धोटे आता याविषयी आपल्या नगरसेवकांना कितपत आणि कशाप्रकारे न्याय देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here