गाव नमुना आठ अ आमच्या नावाने दया , अन्यथा आमरण उपोषण करू

0
94
Advertisements

भद्रावती.. अब्बास अजानी

पूर्वीप्रमाणेच गाव नमुना-८ अ आमच्या नावाने देण्यात यावा अन्यथा आगामी ग्रा.पं.निवडणूकीवर बहिष्कार टाकू आणि आमरण उपोषण करू असा इशारा भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (रै.) येथील ग्रामस्थांनी पत्रपरिषदेतून प्रशासनाला दिला आहे.
पत्रपरिषदेत चालबर्डी (रै.) येथील ग्रामस्थांनी सांगितले की, चालबर्डी (रै.) येथील 20 कुटुंबांची घरे असलेली जागा ही गावठाण होती. दोन वर्षांपूर्वी पर्यंत आमच्या नावांनी आम्हाला गाव नमुना ८ अ हे दस्तावेज मिळत होते. परंतु आता मात्र आमच्या नावांनी न मिळता शासनाच्या नावांनी मिळते. त्यामुळे घरकुल ,विद्युत मीटर आणि इतर शासकीय योजनांच्या लाभ आम्हास मिळत नाही. याच जागेवर राहणाऱ्या काही लोकांना गाव नमुना ८ अ हे दस्तावेज त्यांच्या नावाने अलीकडे मिळाले आहे. ते कसे मिळाले ? मग आम्हाला का नाही ? असे प्रश्नही ग्रामस्थांनी पत्रपरिषदेत उपस्थित केले.यासंदर्भात ग्रामपंचायत ,पंचायत समिती जिल्ह्याचे पालक मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. त्यानुसार समाज कल्याण व मागास प्रवर्ग मंत्रालयकडून चंद्रपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र आले असून सदर प्रकरणाची चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नाही. असेही ग्रामस्थांनी पत्रपरिषदेत सांगितले.
पत्रपरिषदेला संतोष तांदूळकर , प्रदीप मडावी, विकास चट्टे , बाबुराव इखारे, नामदेव सपाट ,निता नागपुरे ,यादव आलाम ,शंकाबाई आत्राम ,वारलू मडावी ,आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
यासंदर्भात ग्रामसेवक महेंद्र कुमार भालाधरे यांच्याशी संपर्क साधला असता सदर जागा ही भोगवट्याची असून शासन निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

Advertisements

दोषीवर कारवाई करण्यात येईल -गटविकास अधिकारी
चालबर्डी (रै.)येथील वारलू लटारी मडावी आणि इतर ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली असून कोरोनामुळे या प्रकरणाच्या चौकशीला विलंब झाला. येत्या १५ दिवसात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया भद्रावती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ.मंगेश आरेवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here