भाजपने आरक्षण रद्द केले तर राज्य सरकारने करावा महाविकास

0
190
Advertisements
चंद्रपूर – राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीने मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे याकरिता समितीचे संस्थापक अध्यक्ष हाजी अनवर अली यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाजाला सन २०१४ मधे आघाडी सरकारने पाच टक्के आरक्षण घोषित केले होते आणि मा. उच्च न्यायालय मूंबईने या आरक्षणाला संविधानीक असल्याचे मान्य करूनही भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने धार्मिक द्वेषापोटी आरक्षण रद्द केले.
विविध शासकीय आयोगाने मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. मुस्लिम समाज प्रत्येक क्षेत्रात पिछडलेला असून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. डॉ. महेमूदूर्रहमान अभ्यास गटाने सूध्दा आपल्या अहवालात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या संयूक्त घोषणापत्रात मुस्लिम आरक्षण विषयाला मूख्यत: जागा देण्यात आले आहे तरी राज्य सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीने दिला आहे.
यावेळी समितीचे महासचिव फिरोजखान पठाण, उपाध्यक्ष जाकीर शेख, सहसचिव शाहिद कूरेशी, अकबर शेख, मजहर अली, सोहेल शेख, नईमखान, इब्राहिम रजा, अजिज शेख, मौलाना साजिद, अमन अहमद शेख व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here