त्यांनी बंद कोळसा खाणीतून केलं भंगार चोरी पण अडकले पोलिसांच्या तावडीत

0
68
Advertisements

भद्रावती…… अब्बास अजानी
तालुक्यातील ढोरवासा वेकोलीच्या बंद कोळसा खाणीतून भंगार चोरणाऱ्या पाच चोरट्यांना भद्रावती पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार ढोरवासा कोळसा खदान सध्या बंद आहे. त्यामुळे येथे स्क्रॅब डम्पर बंद अवस्थेत उभा होता. या बंद डम्पर मधील अंदाजे आठ टन लोहा अझात चोरट्यांनी चोरून नेण्याची तक्रार वेकोलीचे सुरक्षा निरीक्षक यशवंत ठावरी यांनी १० ऑगस्ट रोजी भद्रावती पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार पोलिसांनी अप क्र.४१०/२०२० कलम ३७९ दाखल करून गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल तुळजेवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तपास हाती घेतला.
गुन्ह्याचा सखोल तपास केला असता नौशाद कुरेशी (३०), शुभम ठाकरे (२१), जमाल शेख (२८), जगन नायक (२४),आणि कमलेश यादव (१९) सर्व रा. घुग्गुस या चोरट्यांनी सदर चोरी केल्याचे निस्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या कडून दोन टन लोहा गॅस कटरचे साहित्य एक महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण ४ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल तुळजेवार पो. शिपाई सचिन गुरनुले केशव चिटगिरे ,हेमराज प्रधान ,निकेश ढगे ,यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here