ती कार नाही ट्रॅव्हल्स, बीबी गावकऱ्यांचा आदर्शग्राम दौरा

0
96
Advertisements

नांदा फाटा – मागील फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायत बिबीने आदर्शगाव पाटोदा, हिवरेबाजार, शिर्डी, शनिशिंगणापूर इत्यादी ठिकाणी बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.), गेडामगुडा येथील १२१ लोकांना ग्राम दर्शन घडविले मात्र गावातील काही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आदर्शगाव दौरा खुपत आहे.
सविस्तर वृत्त असे की, लोकसहभाग व स्मार्ट व्हिलेज निधीमधून आदर्श गाव दौऱ्यादरम्यान छत्री ट्रॅव्हल्स यांच्याकडून ग्रामपंचायतने 3 ट्रॅव्हल्स दौऱ्यावर नेल्या होत्या आणि रीतसर ट्रॅव्हल्स कंपनीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बिल देण्यात आले होते. मात्र ट्रॅव्हल्स कंपनीकडून बिलावर टाकलेले गाडी नंबर चुकीचे आहे असा विरोधकांचा आरोप सत्य आहे. ही ट्रॅव्हल्स कंपनीकडून झालेली चूक आहे.
या प्रकरणात ग्रामपंचायतीचा काहीही दोष नाही. ज्या ट्रॅव्हल कंपनीला आपण ऑर्डर दिला होता त्यांनी सदर बिल दिलेले आहे. आम्ही त्यांनी दिलेले बिल फाईलमध्ये लावले आणि गाडी नंबर वगैरे तपासण्याच्या भानगडीत पडलो नाही. कोणतीही ग्रामपंचायत मोठ्या गाड्यांची रक्कम दिल्यानंतर लहान गाडीचे बिल लावणार नाही. गावातील १२१ लोकांना आम्ही सहलीला नेले होते. आणि आदर्श गावांची पाहणी केली होती.

ग्रामपंचायत बिबीला दिलेले बिल घाईघाईत चुकीने प्रिंट झाले असून बिलात दुरुस्ती करण्यात आली आहे. एका ठिकाणी MH 34 BR 0024 च्या ठिकाणी MH 34 BF 0024 झाले आहे. हे वाहन छत्री ट्रॅव्हल्सच्या नावाने आहे. या योगायोगाचा संबंध उपसरपंच नोकरी करीत असलेल्या शाळेतील एका वाहनाची जोडण्याचा प्रयत्न तक्रारकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बिलात बदल करून देण्यात आले आहे.

Advertisements

संदीप छत्री
संचालक, ट्रॅव्हल्स एजेंसी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here