Advertisements
चंद्रपूर – कोरोना रुग्णांची सेवा करीत असताना डॉ सुनील टेकाम यांना कोरोनाची लागण होऊन ते मृत्युमुखी पडले, आज जग कोरोनाशी एक होऊन लढा देत आहे, आपल्या देशातील, डॉ, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे सर्व कोरोनाशी लढा देत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ टेकाम कोरोना काळात रुग्णांना सेवा देत असतांना त्यांना वीर मरण आले अश्या कोविड योद्धाला शासनाने शहिदाचा दर्जा देऊन त्यांच्या कार्याला सन्मान द्यावा अशी मागणी बहुजन मेडिकोज असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी गुल्हाने यांना निवेदन देत करण्यात आली.
सोबतच त्यांच्या पत्नीला 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य शासनातर्फे देण्यात यावे.
निवेदन देते वेळी मेडिकोज असोसिएशनचे राजू ताटेवार, डॉ सिराज खान, डॉ. राकेश गावतुरे, प्रवीण येरेकर यांची उपस्थिती होती.