गडचांदूर न.प.शासन, प्रशासन विरूद्ध अनोखे आंदोलन

0
112
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगर परिषदेची दुसऱ्यांदा निवडणूक पार पडली व थेट निवडीतून नगराध्यक्षा म्हणून सौ.सविता टेकाम तर युतीतून उपाध्यक्ष राकाँचे शरद जोगी हे विराजमान झाले.मात्र 7,8 महिन्यांचा कालावधी लोटूनही उल्लेखनीय असे विकास कामे याठिकाणी झाल्याचे दिसून येत नाही.इतर बाबी तर दुरच यांनी स्वच्छतेकडे तरी विशेष लक्ष देण्याची तरी गरज होती परंतु असे झाले नाही.आजघडीला शहरातील स्वच्छते विषयी विचार केला तर मन सुन्न होते.शहरातील इतर प्रभागासह विशेषतः प्रभाग 1व 2 याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.नाली सफाई,कीटकनाशक फवारणी व इतर स्वच्छतेच्या कामांना तिलांजली देण्यात आल्याचे आरोप होत असून मागील 4 महिन्यांपासून दररोज घंटागाडी येत नाही.यासंबंधीची माहिती न.प.ला देऊनही याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्यात येत आहे.यासर्व बाबी लक्षात घेता अखेर विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी 24 अॉगस्ट पर्यंत प्रभाग 1 व 2 येथील नाली सफाई,फॉगिंग मशीनद्वारे कीटकनाशक फवारणी करावी तसेच नियमितपणे घरोघरी घंटागाडी पाठवावी अन्यथा 25 अॉगस्ट रोजी सदर प्रभागातील जनतेसोबत प्रभागात ठिकठिकाणी काळे झेंडे व फलक लावून तसेच काळ्या पट्ट्या बांधून न.प.शासन,प्रशासनाचा जाहीर निषेध करण्याचा इशारा नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला होता.मात्र यालाही केराची टोपली दाखविण्यात आली.अखेर भाजप नगरसेवकांनी काळे फुगे आकाशात सोडून,काळ्या पट्ट्या लावून स्थानिक नगरपरिषद शासन,प्रशासनाचा जाहीर निषेध केला.यावेळी नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे,भाजप जेष्ठ नेते महेश शर्मा,शिवाजी सेलोकर,शहराध्यक्ष सतीष उपलेंचवार निलेश ताजने, संदीप शेरकी,विनोद कावळकर,हरीश घोरे,देवराव रंगारी,अजीम बेग,गजानन डोंगरे,अरविंद कोरे,सुनील जोगी,परशुराम मुसळे,कुणाल पारखी,गणेश कावलकर,सुयोग कांगरे, बबलू रासेकर इतरांची उपस्थिती होती.या अनोख्या आंदोलनामुळे आता तरी यांना जाग येईल का हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here