लॉकडाऊन काळात त्याने मागितली शेतकऱ्याला लाच आणि अडकला एसीबीच्या जाळ्यात

0
62
Advertisements

राजुरा : उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे (वय ३५) यांना पंधरा हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पथकाने रंगहान पकडले आहे . यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचान्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे . सविस्तर वृत्त असे की , यातील तक्रारदार हे मौजा विप्पा ता . कोरपणा येथील ५ एकर वनजमीन वडीलोपार्जित काळापासून शेती करीता वापरत आहे. वनहक्क कायदान्वये सदर वनजमीनीचा मालकी ताबा मिळण्याकरीता तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथे अर्ज केला होता . सदर वनजमीनाचा पट्टा तक्रारदार यांचे नावे करून देण्याचे कामाकरीता उपविभागीय अधिकारी राजुरा येथील वनहक्क व्यवस्थापक झुरमुरे यानी १५,०००रू लाचेची मागणी केली , तक्रारदार याना वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव शुरमुरे यांना लाचरक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपतप्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तकार नोंदविली . लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील पो.नि. श्रीमती वैशाली ढाले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथील वनहक्क व्यवस्थापक यांचेविरुद्ध वनजमीन वनहक्क कायदयान्वये तक्रारदार यांचे नावे करून देण्याचे कामाकरीता तडजोडीअती दहा हजार रुपये स्विकारले. त्यांचे विरुध्द पो.स्टे . राजुरा येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली , सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक श्री . राजेश दुद्दलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्री . अविनाश भामरे , पो.नि. वैशाली ढाले , पो.हवा अप्पा जुनघरे , ना.पो.कॉ. ना.पो.कॉ. अजय बागेसर , पो.कॉ. रवि ढेंगळे , रोशन चांदेकर , वैभव गाडगे , व चालक सतिश सिडाम सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here