कोरोनाच्या धर्तीवर रक्तदान अत्यंत गरजेचे – नगरसेवक डोहे

0
89
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“देशात कोरोनाने थैमान घातले असून अशावेळी कित्येक लोकांचे जीव वाचवण्यासाठी रक्तदान अत्यंत गरजेचे” असे मत गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी व्यक्त केले.ते येथील टीचर कॉलनी (साई शांती नगर) प्रभाग क्रं.2 हनुमान मंदिरात “साई शांती युवा गणेश मंडळातर्फे” आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.सामाजिक बांधीलकी जोपासत 70 च्या जवळपास रक्तदातांनी रक्तदान केले.यात महिलांनी सुद्धा सहभाग नोंदविला.डॉक्टर गावीत यांच्या टीमने रक्त संकलन केले तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैभव राव,निलेश चीने,आविष्कार मेश्राम, आकाश गायकवाड,सुहास बोंडे,सुनीत नागे,पानघाटेसह मंडळाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here