चंद्रपूर – देशात कोरोना विषाणूने जात-पात- धर्म एकच आहे हे दाखवून दिले, लॉकडाऊन मुळे गोर गरिबांचा रोजगार बुडाला अनेक नागरिक हवालदिल झाले, दोन वेळचे जेवण सुद्धा या परिस्थितीत मिळणे कठीण झाले होते, काहींनी तर या नैराश्येतुन स्वतः ला न सावरत आत्महत्या केली.
काही वर्षापासून देशात हिंदू मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम राजकीय व्यक्तीकडून होत आहे परंतु द्वेषाच राजकारण व कोरोना परिस्थितीत चंद्रपूर शहरातील एका युवकाने माणुसकीचा धर्म काय असतो तो कशाप्रकारे कायम ठेवायचा असतो याची जाणीव करून दिली.
तसा तर हा युवक मुस्लिम समाजाचा त्याचं नाव आहे हकीम हुसैन परंतु माणुसकीच्या प्रेमापोटी व आपली स्वतःची फक्त भारत आहे असे सांगत त्याने स्वतःच नाव भारत ठेवले.
पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या भारतने लॉकडाऊन काळात अनेक सामाजिक कामे केली, ज्यांचा रोजगार बुडाला त्यांना अन्न धान्याची किट, 2 वेळचे जेवण हा नित्यक्रम या काळात सुरू ठेवला.
हे सामाजिक काम कोरोना काळात नव्हे तर त्या आधीपासून सुरू आहे, रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन या संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आतापर्यंत या संघटनेला हजारो युवक जोडल्या गेले.
संकटाच्या वेळी नेहमी धावून जाणारा भारत नेहमीचं रक्तदान सारख्या कार्यात सदैव तत्पर असतो, अनेक राजकीय नेत्यांना भुरळ पाडणार व्यक्तिमत्व म्हणजे हा चंद्रपुरातील भारत होय.
सोशल मीडियामध्ये भारत हुसैन नागरिकांना सामाजिक कार्य, गोर गरिबांची मदत कशी करावी, त्यासाठी आपण काय करायला हवं याच मार्गदर्शन नेहमीच करीत असतो, news34 तर्फे भारत च्या या कार्याला सलाम.
माणुसकी धर्माची जाणं दाखविणारा चंद्रपुरातील हा “भारत”
Advertisements