भद्रावती, वरोरा तालुक्यात लम्पी आजारावर लसीकरण

0
95
Advertisements

वरोरा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात लम्पी आजाराने तोंड वर काढले आहे. सध्या हंगाम सुरु असतानाच या आजारामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यातच बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारासंदर्भात लस उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसा खर्च करून जनावरांना लस द्यावी लागत आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट बघता जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेने वरोरा तसेच भद्रावती तालुक्यातील गावागावांत लसीकरण शिबिर आयोजित केले आहे.
शेतकऱ्यांनी काळजी न करता आयोजित शिबिरामध्ये जनावरांना नि:शुल्क लस टोचून घ्यावी, असे आवाहन जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष रमेश राजुरकर यांनी केले आहे.
हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम पडतोे. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होते. पायावरील गाठींमुळे जनावरांना चालतांना त्रास होतो. बाधित जनावरांच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्त्राव, दुध आदींच्या माध्यमातून हा आजार निरोगी जनावरांत पसरतो. त्यामुळे जय गुुरुदेव स्वच्छ जल संस्थेच्या वतीने या आजारासंदर्भात जनजागृती तसेच लसीकरण शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येत असल्याची माहितीही संस्थेचे अध्यक्ष रमेश राजुरकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here