साईशांती युवा गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबीर

0
53
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“रक्तदान श्रेष्ठदान” या म्हणीप्रमाणे गडचांदूर येथील शिक्षक कॉलनी(साई शांती नगर)प्रभाग क्रं.2 येथील हनुमान मंदिर येथे “साईशांती युवा गणेश मंडळ” च्या वतीने 24 अॉगस्ट सोमवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक बांधीलकी जोपासणार्‍या रक्तदात्यांनी या निमित्ताने रक्तदानासाठी समोर येण्याचे आवाहन सदर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.दरवर्षी मंडळातर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असून यंदा “कोरोना” महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून शिबीर पार पाडणार असल्याची माहिती मंडळ पदाधिकाऱ्यांनी News34 ला दिली असून जास्तीतजास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here