मरकागोंदी नळयोजनेचा बट्याबोळ, लाखोंचा निधी गेला पाण्यात

0
130
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जिवती तालुक्यातील डोंगरपायथ्याशी पकड़ीगुड्डम पंचक्रोशीतील “धनकदेवी ” ग्रामपंचायत अतर्गत 100% आदिवासी लोकवस्तीत नळयोजनेसाठी लाखोंचा निधी खर्च झाला मात्र सदर योजना सुरू होण्या पुर्वीच लोकांची तुष्णा न भागविता बंद अवस्थेत धुळखात पडून आहे.पाणी पुरवठा योजनेचा निधी पाण्यात गेल्याचे आरोप असून गावात बोअरवेल अस्तित्वात आहे मात्र पाणी शुद्धीकरण(ब्लिचिंग)नियमितपणे केल्या जात नसल्याने बोअरवेल जवळ साचलेल्या सांड पाण्याने पाणी दुषित होत आहे.ग्रामपंचायतला पेसा 14 वितीय आयोगाचा लाखोंचा निधी मिळतो.पंरतु गावात एकही काम या 4 वर्षात झाले नसल्याची बोंब सुरू आहे.नाली बांधकाम व सांडपाणी वाहते आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सूरू असून तातडीने शोषखड्डे तयार करून सांड पाण्याची विल्हेवाट व परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here