स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थांना सोयीनुसार निवडता येणार परीक्षा केंद्र

0
82
Advertisements

चंद्रपूर – कोरोनाच्या पार्शभूमीवर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थांना एच्छिक परीक्षा केंद्र निवडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीच्या पुर्ततेसाठी त्यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडेही सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता स्पर्धा परीक्षांकरिता विद्यार्थांना २१ ते २६ ऑगष्ट या कालावधीत सोयीनुसार नवीन परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. तसे परिपत्रकही काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे.

एमपीएससीतर्फे २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा ३ मे रोजी घेतली जाणार होती. त्यानुसार स्पर्धेची अनेक युवक दिल्ली, पुणे, मुंबई, हैदराबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी तयारी करीत असलेले शहरच परीक्षा केंद्र म्हणून निवड केली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थी स्वगृही परतलेत . या पार्श्वभूमीवर दुय्यम परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार ७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात येत्या ११ ऑक्टोबर रोजी दुय्यम सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र आता पुन्हा पुणे, मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी जावून परीक्षा देणे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता त्यांना परीक्षा केंद्र बदलविण्याची मुभा देत त्यांच्या सोईचे केंद्र निवडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. या मागणी संदर्भात त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थांना सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार २१ ते २६ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्र बदलविता येणार आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here