वरोरा – वरोरा तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिनोरा गावातील करिष्मा मालवे नामक महिलेला प्रसूतीच्या कळा आल्याने सकाळी 9 वाजताच्या सुमारास परिवारातील सदस्यांनी 108 वर कॉल करून एम्बुलेन्स ला पाचारण केले परंतु एम्बुलेन्स वेळेवर न येत असल्याचे बघून करिष्माला ऑटोतून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच करिश्माने बाळाला जन्म दिला.
कोरोनाच्या या महामारीत वेळेवर रुग्णांना सोडण्याचे काम सध्या 108 वर सोपविण्यात आले आहे परंतु अपघात व तात्काळ परिस्थिती मध्ये या सेवा कुठेतरी मागे पडत आहे.
याचंच उदाहरण म्हणजे करिष्मा मालवे ही महिला, जर वेळेवर एम्बुलेन्सद्वारे या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले असते तर तिची प्रसूती ऑटोत झाली नसती.
देशात एकीकडे आरोग्याच्या क्षेत्रात क्रांती आणण्याच्या बोंबा मारून नागरिकांना वेळेवर या सुविधा मिळत नाही.
सध्या करिष्मा व लहान बाळाची प्रकृती ही ठीक असल्याने ती वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
अनं करिश्माने ऑटोतच दिला बाळाला जन्म
Advertisements