अबब यांना कायद्याची भीतीचं नाही ” कोर्टाचा अवमान ” करून मुजोरीने बांधकाम

0
114
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा
नांदा येथील व्यापारी रामअवतार नावधंर यांचे विना शासन परवानगी , अनधिकृत , बेकायदा बांधकाम प्रकरणात चंद्रपूर जिल्हा कोर्टाने १४/०८/२०२० रोजी मनाई हुकूम पारीत केला असतांनाही नावधंर यांना कायद्याची भीती नसल्याने कोर्टाच्या आदेशाचा भंग करुन न‍ावधंर यांनी मुजोरीने दिनांक २०/०८/२०२० बांधकाम सुरु केले असल्याने कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नांदा ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी , गडचांदूर यांचेकडे तक्रार केली असून नावधंर यांचे बांधकाम तात्काळ बंद करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पोलीस काय कारवाई करतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले

नांदा येथील प्रतिष्ठित व्यापारी रामअवतार नावधंर यांनी सर्वे क्रमांक १४ व सर्वे क्रमांक १५ या दोन्ही लेआऊट मधोमधील जागेवर अतिक्रमण करुन वाल कंपाउंड करून बांधकाम सुरू केले होते यासंमधाने २०१८ मध्ये नांदा ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी तहसिलदार कोरपना यांचेकडे तक्रार दाखल केली होती प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना ऐन लाॅकडाऊन काळात कुठलीही शासन परवानगी न घेता नावधंर यांनी बेकायदा अनधिकृतपणे वाणिज्य वापराचे हेतूने बांधकाम सुरु केले विनापरवानगी बांधकाम असल्याने नांदा ग्रामपंचायतीने बांधकाम बंद करण्याच्या अनेक नोटीसा पाठविल्यावरही मुजोरीने बांधकाम सुरुच ठेवले अखेर ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी दिनांक २४/०८/२०२० रोजी चंद्रपूर कोर्टात दावा दाखल केला दिनांक १४/०८/२०२० रोजी कोर्टाव्दारे मनाई हुकुम जारी केला असुन दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत बांधकाम करण्यास मनाई आहे याबाबतची माहिती असतांनाही जाणीवपूर्वक कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करुन नांवधर यांनी परत २०/०८/२०२० पासुन बांधकाम सुरु केले आहेत नावधंर यांना कायद्याची कसलीही भीती नसल्याने कोर्टाचा अवमान केला जात आहे नांदा ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर , ग्रामपंचायत नांदा व गडचांदूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे पोलीस काय करतील याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे

Advertisements

नांदा ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांची राजकिय साथ असल्याने कोर्टाचा अवमान करुन नावधंर मुजोरीने बांधकाम करीत आहे कायद्याचे पालन होत नसल्याने पोलीसात लेखी तक्रार दिली असून पोलीसांनी कारवाई करणे अपेक्षीत आहे

प्रिया विलास राजगडकर
सदस्या ग्रामपंचायत नांदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here