गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 1 माजी सरपंच डॉ. मेश्राम हे वास्तव्यास असलेल्य परिसरात गेल्या 8 दिवसांपुर्वी कोरोना रूग्ण सापडल्याने सदर परिसर सील करण्यात आला.माणुसकीचे दर्शन देत याठिकाणी नगरपरिषद नगराध्यक्षा,उपाध्यक्ष यांच्यासह काही नगरसेवकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करताना मोठ्याप्रमाणात फोटोसेशन केल्याचे दिसून येत आहे.एकीकडे सदर कार्याची सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रशंसा होत आहे तर दुसरीकडे कीट वाटप करताना ही मंडळी प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संपर्कात आल्याचे चित्र दिसत आहे.यामुळे खबरदारी म्हणून यांना त्वरित संस्थात्मक कॉरंटाईन करून त्यांचे स्वैब घेण्यात यावे अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष(ग्रामीण) शिवाजी सेलोकर यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.कळत नकळत जर काही विपरीत घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील असा इशारा निवेदनातून दिला आहे.
वास्तविक पाहता नियमाप्रमाणे जेव्हा प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले जाते त्या परिसरातील लोकांना बाहेर निघता तसेच बाहेरच्यांना आत जाता येत नाही.एकुणच संपर्कात येता येत नाही.जर अशावेळी एखादा व्यक्ती संक्रमित राहीला तर संक्रमणाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे असताना या प्रतिबंधित क्षेत्रात चक्क लोकप्रतिनिधीच बिनधास्तपणे यांच्या हातात कीट देत आहे.तरी सुरक्षेच्या दृष्टीने यांना संस्थात्मक कॉरंटाईन करून यांचे स्वैब नमुने घेण्यात यावे अन्यथा भविष्यात रूग्ण वाढु शकतात अशी शक्यता सेलोकर यांनी वर्तवली आहे.आता मुख्याधिकारी याप्रकरणी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासंबंधी वरिष्ठांना ही निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
तसेच शिवाजी सेलोकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच प्रतिबंधित क्षेत्रात तेथील नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप शासनाच्या नियमांच्या अधीन राहून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले हे मात्र विशेष.यावेळी भाजप शहराध्यक्ष सतीष उपलेंचवार,नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,हरीश घोरे,संदीप शेरकी इतरांची उपस्थिती होती.
प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांना “कॉरंटाईन करून स्वैब घ्या”
Advertisements