गर्दीच्या ठिकाणी चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप  

0
64
Advertisements
चंद्रपूर : कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात जगात, देशात राज्यात तसेच जिल्ह्यात देखील थैमान आहे. जिल्हात दिवसाला संख्या वाढत आहे. मोठ्या प्रमाणात मृत्यू देखील होत आहे. आज गणेश चतुर्थी निमित्य मोठ्या प्रमाणात बाजार पेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक विक्रेते व ग्राहक यांच्याकडे मास्क व सॅनिटायझर नसल्याचे चित्र दिसत होते. याची दखल घेत रितेश(रामु) तिवारी अध्यक्ष, चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी यांनी स्वतः  मास्क व शनिटायझरचे वाटप केले.
22-8-2020 ला गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक गांधी चौक, रघुवंशी काम्प्लेक्स, जटपुरा गेट आणि छोटी बाजार  जवळ जे गणेश चतुर्थी निमित्त लागणारे सामान, गणेश मूर्ति इत्यादि दुकाने लागली होती. यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात होती. हे लक्षात येताच, रितेश(रामु) तिवारी अध्यक्ष, चंद्रपूर शहर(जिल्हा) कॉंग्रेस कमेटी, यांनी स्वतः  तिथे जाऊन दुकानदारांना व उपस्थित ग्राहकांना आणि सामान्य जनतेला आपल्या सुरक्षेत असणारे कोरोना योद्धा पोलीस बांधव यांना मास्क व  सॅनिटायझर  वाटून त्यांना स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यायला सांगितले. यावेळी नगरसेवक निलेश खोब्रागडे, गोपाल अमृतकर, प्रसन्ना शिरवार, पप्पू सिद्दीकी, कुणाल चहारे, मिनल शर्मा, आकाश तिवारी, करण चौव्हान, केतन दुरसेल्वार, आकाश सातपुते, तुषार दुरसेल्वार, अमित वाईकोर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here