बसमधून प्रवास केल्यास 14 दिवस होम कोरेन्टाईन – जिल्हाधिकारी गुल्हाने यांचा आदेश

0
236
Advertisements

चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या आंतरजिल्हा बसेसची परवानगी मिळाल्यावर सध्या नियमानुसार प्रवासी संख्येत आंतरजिल्हा प्रवास सुरु करण्यात आला आहे.
परंतु या प्रवासात नागरिकांना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे, स्वतःजवळ प्रवाश्यानी ओळखपत्र अवश्य ठेवावे.
सध्या 50% टक्के प्रवासिसह बसेसला परवानगी मिळाली असली तरी 50% च्या वर प्रवासी बसमध्ये आढळल्यास आगारप्रमुखांवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कारवाई करण्याच्या प्रशासनातर्फे सूचित करण्यात आले आहे.
बसमध्ये सॅनिटायझर, बसचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, प्रवाश्यांची संपूर्ण माहिती घेणे ही बसवाहकाची जबाबदारी असेल, बसचालक व वाहकांची 7 दिवसातून एकदा कोरोना चाचणी स्थानिक रुग्णालयामार्फत करण्यात यावी.
दुसऱ्या जिल्ह्यातून चंद्रपुरात प्रवेश केल्यानंतर प्रवाश्याना 14 दिवस गृह अलगीकरणात राहणे बंधनकारक असणार आहे, तर रेड झोन किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातून प्रवास केला असल्यास त्या प्रवाश्याला संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक असणार आहे.
प्रवाश्यांचे प्रति दिवसाचे तपशील आगारप्रमुख यांनी प्रशासनाला पाठविणे गरजेचे आहे असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here