त्या जोडप्याला मानवाधिकार व आरपीआयची मिळाली साथ

0
62
Advertisements

चंद्रपूर – लग्नाला घरचा विरोध आणि त्या जोडप्याचा विवाह आरपीआय व भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या वतीने संपन्न करण्यात आला.
शंकर पांचाळ व शीतल मोगरकर हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते परंतु या दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्याने घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.
सात जन्माच्या गाठी आपल्याला बांधायच्या असा दृढ निश्चय करीत त्यांनी आरपीआय व मानवाधिकार पार्टी कडे मदत मागितली त्यांच्या मदतीला हात देत विदर्भ संपर्क प्रमुख शेखर तावाडे, आरपीआयच्या विदर्भ महिला अध्यक्ष प्रियाताई खाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या जोडप्यांच्या थ्रीटी बुद्धविहार नॅशनल पार्क रमाबाई नगरात आंतरजातीय विवाह पार पाडला.
जोडप्यांना आशीर्वाद व उज्वल भविष्याच्या शुभकामना देण्यासाठी डी.एस. माथने, कविता महाजन, सीमा डोंगरे, शर्मिला बिस्वास, सुधा चहारे व तपन कुमार रॉय यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here