चंद्रपूर – स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या निकालात चंद्रपूर महानगरपालिका देशात चौथी तर राज्यात स्वच्छतेत प्रथम आली, राज्यात स्वच्छतेत प्रथम आल्यावर समाज माध्यमातून महानगरपालिकेवर टीकेची झोड सुरू झाली.
शहरातील रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठा याबाबतीत पालिकेविरोधात नेहमीच नागरिकांच्या तक्रारी आहे.
शहरातील घुटकाला प्रभागात मागील 15 दिवसापासून नगरसेवक नागपुरे यांच्या घरासमोर कचऱ्याचा ढीग पालिकेद्वारा साठवून ठेवण्यात आला आहे.
ते सुद्धा प्रभागातील मुख्य रस्त्यावर या मार्गावरून नागरिक मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतात, कचऱ्याचा ढीग नेहरू शाळेसमोर करण्यात आला आहे, विशेष म्हणजे या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पाणी पुरवठा वॉल आहे, त्यामुळे पावसात नागरिकांना दूषित पाणी पुरवठा व्हायला लागला आहे, नागरिक तक्रार करतात परंतु नगरसेवक मात्र तक्रारींवर डोळेझाक करीत असतात.
स्वच्छतेत नेहमी आम्हीचं भारी, कचरा तुमच्या रस्त्यावरी – चंद्रपूर महानगरपालिका
Advertisements