ऊर्जानगर(चंद्रपूर):- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॅा.नरेंद्र दाभोळकर यांचा दि.२० आगस्ट २०१३ ला सकाळी मॉर्निग वॅाकवरून परत येताना त्याच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.त्या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली.परंतु अजूनही खुनी सापडले नाही ही खंत कार्यकर्त्याकडून व्यक्त करण्यात आली.या खुन्याचा लवकरात लवकर तपास यंत्रणेने करावा असा ईमेल मा पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालय करण्यात आला आहे.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा ऊर्जानगरच्या वतीने वसाहतीतील अंभोरा चौकात गणपती विसर्जन परिसरात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या नियमाचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून व मास्क वापरून सकाळी शहीद डाँ नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून अभिवादन करण्यात आले आणि दुपारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा प्रधान सचिव नारायण चव्हाण ,नरेंद्र रहाटे तसेच ऊर्जानगर शाखेचे अध्यक्ष शिवाजी नागरे,कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर, सचिव दुरेंद्र गेडाम,मुरलीधर राठोड,किशोर मुगल,राजा वेमुला ,बालकुमार सोमलकर, विजय राठोड,प्रेषित चव्हाण तसेच अंनिसचे पदाधिकारी व सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शहीद डाँ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमीत्य महा अंनिस ऊर्जानगर तर्फे वृक्षारोपण
Advertisements