चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी गुल्हाने कोरेन्टाईन पण ऑन ड्युटी

0
83
Advertisements

चंद्रपूर – 20 ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यात नवे 54 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, व गडचांदूर शहरातील 52 वर्षीय नागरिकांचा मृत्यू झाला, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 10 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने रुजू झाले आहे, त्यांचे सुरक्षारक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आता नवे जिल्हाधिकारी 2 दिवस स्वतः कोरेन्टाईन असणार आहे.
ते स्वतः शासकीय विश्रामगृहातून कार्यालयातील कामे पार पाडणार आहे.
सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार नाही ज्या नागरिकांना अत्यन्त महत्वाचे काम असल्यास ते कार्यालयात येऊन आपली कामे आटोपु शकतात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here