जनसत्याग्रह संघटनेच्या महिलांनी काढला अवैध दारुविक्रेत्यांचा बडगा.

0
58
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील धार्मिक स्थळांपैकी एक कुसळ येथील जनसत्याग्रह संघटना महिला आघाडीच्या महिलांनी गावातील अवैध दारू विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर गावात गुरूदेव सामाजिक मंडळ कार्यरत असल्याने व तिर्थस्थळ असल्याने गावात दारूविक्री होत नव्हती.आणि दारू पिणाऱ्यांची संख्याही कमी होती.दरम्यान एका जोडप्याने गावात अवैध दारूविक्रीला सुरूवात केल्यामुळे याठिकाणी बाहेर गावच्या दारू बाजांची अक्षरशः गर्दी वाढत गेली.गावकऱ्यांचा याला तीव्र विरोध होता.मात्र दिवसेंदिवस दारूविक्रेत्यांची मुजोरी व अरेरावी वाढत होती.यासंदर्भात अनेकदा तक्रारी सुध्दा देण्यात आल्या.मात्र काहीही परिणाम झाला नाही.शेवटी महिलांनीच पुढाकार घेत एकत्र येऊन यापुढे गावात दारू येऊ देणार नाही व विक्री करू देणार नाही असा निर्धार करत बडग्याच्या दिवशी सकाळच्या सुमारास दारू विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर कामगिरी सुभद्रा सोयाम,वैशाली कुमरे,सुंनदा तोडासे,रेखा तोडासे, शशीकला सलाम,शांता गंधमवार इतरांनी पारपाडली असून यापुढे गावात दारूविक्री व दारू पुरवठा करणाऱ्यास जनसत्याग्रह संघटना महिला आघाडीतर्फे विरोध केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here