शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑनलाइन प्रवेश सुरु

0
57
Advertisements

चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेश केन्द्रीय ऑनलाईन पध्दतीने होत आहे. प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तीका, प्रवेश पध्दती नियमावली व प्रामाणिक कार्यपध्दती www.admission.dvet.gov.in या  संकेत स्थळावर डाउनलोड सेक्शन मध्ये पिडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रकीयेबाबत मार्गदर्शन करण्याकरीता प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दि. 1 ऑगष्ट 2020 पासुन रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सर्व सुटीचे दिवशी देखील मार्गदर्शन व प्रवेश प्रकीये सबंधी कार्यवाही सुरु राहिल.

Advertisements

प्रवेश पध्दती, नियमावली, संकेतस्थळाच्या संबंधित तांत्रिक व इतर मार्गदर्शनास्तव अडचणी आल्यास नजीकचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संपर्क साधावा.

सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रकीयेस सहभागी असुन या केंद्रात उमेदवार माहिती, मार्गदर्शन प्राप्त करु शकतील. तसेच प्रवेश प्रक्रियेसबंधी सेवा प्राप्त करु शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here