गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणार्या “युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित” या संस्थेंनी करारनाम्याच्या विरुद्ध कामे करून शासनाची फसवणूक व दिशाभूल केली असून अशा संस्थेला नगरपरीषदेने काळ्या यादीत टाकून कायदेशीर कारवाई करावी तसेच या महाघोटाळ्यात समाविष्ट संबंधित अधिकारी कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मीचे उपजिल्हा प्रमुख मदन बोरकर यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे निवेदनातून केली होती.परंतु याविषयी कारवाई तर दुरच साधी चौकशीही झाली नाही.त्यामुळे या महाघोटाळ्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २१ अॉगस्ट शुक्रवार रोजी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती मदन बोरकर यांनी News34 ला दिली असून यासंबंधीचे निवेदन कोरपना तहसीलदार यांना दिल्याचे म्हटले आहे.
घनकचरा घोटाळ्याची चौकशी थंडबसत्यात, बोरकर करणार एक दिवसीय धरणे आंदोलन
Advertisements