शेगाव – 18 ऑगस्टला शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरी बिडकर या गावी शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्यावर काही समाजकंटकांनी हात उगारला.
ज्यांनी हात उगारला ते दारू माफिया होते की दुसरे यावर अजून अधिकृत माहिती मिळाली नाही, परंतु या प्रकरणात पोलीस निरीक्षक बोरकुटे हे एकाच कर्मचाऱ्याला घेऊन कोणत्या कारवाईसाठी गेले होते हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ज्यांनी ठाणेदार बोरकुटे यांचेवर हात उगारला ते दारू माफिया यांचे जवळीक आहे, त्यामध्ये संदीप ठवरे, सुधीर ठवरे व सतिराम ठवरे यांचा समावेश आहे.
दारू माफिया असो की रेती माफिया त्यांची दादागिरी सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढत आहे, दारू माफियावर कारवाई करताना स्वतःचा जीव गमावलेले छत्रपती चिडे असो की दारू माफियांने मारहाण केलेल्या पोलीस कर्मचारी लाकडे जेव्हा दारू माफिया पोलिसांवर हात उगारायला घाबरत नाही तर सामान्य जनतेच काय होणार? हा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उपस्थित राहिला आहे.