गडचांदूरातील गांधी चौकात यंदा ध्वजारोहण नाही, जुन्या परंपरेला तडा, नागरिकांची भावना तीव्र

0
60
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 पासून गडचांदूर येथील गांधी चौकात 15 अॉगस्ट व 26 जानेवारी रोजी सकाळी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्याची परंपरा सुरू आहे.मात्र यंदा 15 अॉगस्ट स्वातंत्र्य दिनी येथे तिरंगा फडकला नसल्याने गडचांदूरकरात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.प्रचंड नाराजी व्यक्त होत असून स्थानिक नगरपरिषद अधिकार्‍याच्या अरेरावी व हिटलरशाहीपुढे यंदाचे लोकप्रतिनिधी अक्षरशः लाचार व बुजगावणे बनल्याचे आरोपांसह यांच्या अज्ञानीपणामुळे जून्या परंपरेला तडा गेल्याची तिव्र भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्यानंतर 1948 रोजी येथील प्रतिष्ठित नागरिक सखाराम पाटील गोरे यांनी सर्वप्रथम गांधी चौकात झेंडावंदन केल्याची माहिती असून तेंव्हापासून ग्रामपंचायत आणि आता अस्तित्वात असलेल्या नगरपरिषदेपर्यंत दरवेळी मोठ्या थाटामाटात शहराच्या मध्यभागी असलेल्या या चौकात तिरंगा ध्वज फडकविला जात होता मात्र यंदाच्या स्वातंत्र्य दिनी याठिकाणी तिरंगा फडकला नसल्याने शहरातील नागरिकांत याविषयी नाराजी असल्याचे पाहून News34 प्रतिनिधीने काहींची प्रतिक्रिया जाणून घेतली.
———————–//——————-
“स्थानिक नगरपरिषदेच्या गलथानपणामुळे यंदा या परंपरेला खीळ बसलेली असून “कोरोना” महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून याठिकाणी सुद्धा झेंडावंदन करण्यात काही अडचण नव्हती.मात्र असे झाले नाही याची खंत मनात आहे.”
(माजी सरपंच,रऊफ शेख गडचांदूर)
————————————————
“यंदा गडचांदूर नगरपरिषदेत अध्यक्ष,उपाध्यक्षासह जे लोक बसून आहे त्यांना नॉलेज नाही.निव्वळ मुख्याधिकारी यांच्याप्रमाणे कामकाज सुरू आहे.वास्तविक पाहता गावा बद्दलचे निर्णय ठरावच्या माध्यमातून अध्यक्ष घेत असतो आणि co त्या ठरावाला फॉलो करतात.मात्र याठिकाणी असे होताना दिसून येत नाही.सध्या co ची मनमानी सुरू असून यांच्यापुढे एकाही लोकप्रतिनिधींचे काहीच चालत नाही.नगरपरिषदेत अज्ञानी लोक बसल्याचे हे फलित आहे असे माझे मत आहे.”
(शिवाजी सेलोकर,जेष्ठ भाजप नेते गडचांदूर)
———————————————–
“नगरपरिषद येथे 13 अॉगस्ट रोजी सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती.त्यात मुख्याधिकारी यांनी सभेत सांगितले की,मा.जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे की,यावर्षी 15 अॉगस्टला केवळ तहसील कार्यालयात ध्वजारोहन करायचे आहे.परंतु आपलं शहर मोठं व नगरपरिषद असल्याने आपल्याला नगरसेवक तथा कर्मचारी मिळून (सोशल डिस्टंसिंग) सामाजिक अंतर राखून ध्वजारोहन करता येतील.बाकी ठिकाणी करता येणार नाही.प्रशासकिय अधिकारी यांनी मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याचे सांगितल्यावर मी काहीही बोललो नाही.परंतु सभेत आदेशाची प्रत देण्यात आली नाही.जर आदेश नसतील तर मुख्याधिकारी यांनी सभागृहाची दिशाभूल केली असे म्हणता येईल.”
(अरविंद डोहे,नगरसेवक गडचांदूर)
———————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here