त्या नर अस्वलाच्या रेल्वेच्या धडकेत मृत्यू

0
252
Advertisements

तळोधी  -आलेवाही सेक्सन ला तळोधी जंक्शन जवळच रात्रौ 10 वाजता चंद्रपूर वरून येणाऱ्या क्र. 1149/16 मालगाडी च्या धडके अस्वलाचा मृत्यू .
सविस्तर, बाळापूर सामाजिक वनीकरण क्षेत्रातील, बाळापूर बिटातील, कंपार्टमेंट-72 मधील रेल्वे रूळ ओलांडताना रात्री 10 वाजता चंद्रपूर वरून येणाऱ्या मालगाडी क्र. 1149/16 ने दिलेल्या धडकेत मेलेले अस्वल नर असून अपघातात मेलेल्या नर अस्वलाचे वय अंदाजे 5 वर्ष असल्याचे कळले.  सकळी तळोधी (बा.) येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. श्री डी.जी. टेकाम यांनी शवविच्छेदन केले, सामाजिक वनीकरण बाळापुर चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस. ए.कुलबांधे व त्यांची टिमच्या उपस्थित शवविच्छेदन करून अस्वलाला वनीकरण चा लकडा डेपो बाळापुर येथे जाळन्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here