कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळायलाच हवे – संदीप गिर्हे

0
91
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपुरात सर्वात गाजलेला विषय म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे वेतन, जनविकास सेनेच्या वतीने हा मुद्दा नेहमी गाजत असतो मात्र वेतन काही मिळत नाही.
काही दिवसांपूर्वी पाटील नामक कंत्राटी कामगार महिलेचा कामावर असताना मृत्यू झाला.
आज वैधकीय महाविद्यालयात एकूण 500 च्या जवळपास कंत्राटी कामगार काम करीत आहे.
कोरोना काळात सुद्धा या सर्वांनी निशुल्क सेवा दिली कारण वेतन त्यांना मागील 5 महिन्याचे मिळाले नव्हते, मागील आठवड्यात त्यांना 2 महिन्याचे वेतन मिळाले.
अजूनही 3 महिन्याचे वेतन बाकीचं आहे, या मुद्द्यावर आता शिवसेना समोर आली आहे, त्यानी याबाबत अधिष्ठाता डॉ. मोरे यांची भेट घेत कंत्राटी कामगारांचे उर्वरित वेतन द्यावे यासंदर्भात चर्चा केली, यावर डॉ. मोरे यांनी या आठवड्यात कामगारांचे उर्वरित 3 महिन्याचे वेतन करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना सांगितले.
कोरोना सारख्या कठीण काळात पण न डगमगता कंत्राटी कामगारांनी आपली सेवा दिली आहे वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यांच्या हक्काचं वेतन त्यांना मिळायलाच हवे असे गिर्हे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शहरप्रमुख प्रमोद पाटील, गणेश ठाकूर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here