गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोणत्याही निवडणुका जिंकायच्या झाल्याच तर पक्षसंघटन अतिशय महत्त्वाचे आहे.काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालणारा पक्ष असून तळागाळातील कार्यकर्ते पक्षाला जुळलेले आहे.पक्ष संघटनेत व विविध शासकीय,अशासकीय समित्यांवर ज्येष्ठांसोबतच नव तरुण चेहऱ्यांना संधी देणार” असे प्रतिपादन राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.ते गडचांदूर येथील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या काँग्रसच्या एका छोटेखानी बैठक कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.यावेळी मंचावर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विठ्ठल थिपे,राजुरा न.प.चे नगराध्यक्ष अरुण धोटे,गडचांदूर न.प.च्या नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,तालुका महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा ललिता गेडाम,पंचायत समिती सभापती रुपाली तोडासे,उपसभापती सिंधुताई आस्वले,काँग्रेसचे नेते पापय्या पोन्नमवार,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी,गटनेता विक्रम येरणे,माजी विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर,नामदेव येरणे,धनंजय गोरे यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी “संतोस महाडोळे” तर गडचांदूर युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी “रुपेश चुधरी” यांची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे संचालन शैलेश लोखंडे व आशिष वांढरे यांनी तर आभार न.प.गटनेता विक्रम येरणे यांनी व्यक्त केले.
काँग्रेस व युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षांची निवड
Advertisements