चंद्रपूर – भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूर हा क्रांती लढा एक सोनेरी पान म्हणून कायम स्मरणात आहे. संपूर्ण देश गुलामीत असतांना चिमूर गाव स्वतंत्र झाले होते. या स्वतंत्र लढ्यातील शहिदांना आज विठाई बहुउद्देशीय संस्थेचा वतीने जटपुरा गेट गांधी पुतळा येथील स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यात आली.
१६ ऑगस्ट चिमूर येथे शहीद दिवस म्हणून पाळण्यात येते.
८ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधींनी ग्वालिया टॅंक मैदानावरून इंग्रजांना “चले जावं” चा नारा देत . भारतीयांना “करो वा मरो” हा संदेश दिला. या संदेशाची दखल चिमूर येथील क्रांतिकारकांनी घेतली. या लढ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रेरित करणाऱ्या भजनांनी चिमुरात क्रांती निर्माण झाली.चिमुरचा स्वातंत्रासाठी अनेकांनी आपले जीव देऊन शहीद झाले. याच दिवसाची आठवण आजही १६ ऑगस्ट चिमूर येथे शहीद दिवस पाळण्यात येतो.
या शहिदांना चंद्रपुरातील विठाई बहुउद्देशीय संस्थे तर्फे जटपुरा गेट गांधी पुतळा येथील स्मारकाला स्वातंत्र सैनिक यांची पत्नी विठाबाई काहिलकर यांचा हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळेस संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, संजीवनी कुबेर, ओमप्रकाश मिसार, दिनेश जुमडे, भारती कश्यप, कीर्ती नगराळे, प्रीतम रागीट,माधुरी काहिलकर, चेतन जनबंधु, राजू काहिलकर, सागर जोगी, वैभव माकडे, धर्मेंद्र लुनावत इत्यादींची उपस्थिती होती.
चिमूर येथील स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना विठाई बहुउद्देशीय संस्थेने वाहिली श्रद्धांजली
Advertisements