Advertisements
वरोरा : आजवर वाळूचे लिलाव झालेल्या गावांना निधी मिळत नव्हता. त्यामुळे ज्या गावात वाळू घाट आहेत त्यांना खनिज विकास निधीच्या प्रत्यक्ष लाभ मिळत नव्हता. त्यामुळे ते गाव विकासापासून दूर राहत होते. परंतु आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्या गावांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याकरिता २५ टक्के निधी त्या गावाला मिळण्याची मागणी केली.त्यामधील वरोरा तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीला ५७ लाख ९१ हजार निधी प्राप्त झाला आहे. त्या निधीचे धनादेश आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आहे.
वाळूचा लिलाव करण्यासाठी ग्रामपंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र लागत असते. ते देण्यात देखील येते. परंतु ज्या ग्रामपंचायतने हा वाळू घाट जपून ठेवलेला असतो त्याला अवैद्य तस्करांपासून बचाव केलेला असतो. त्यांना मात्र लिलाव झाल्यानंतर देखील लाभ मिळत नसते. त्यामुळे ते गाव विकासापासून वंचित राहत असते. त्यामुळे या गावांना देखील लाभ मिळण्याकरिता खनिज प्रतिष्ठान च्या माध्यमातून २५ टक्के निधी त्या गावाला देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोकर यांनी केली होती. हि लोकहितार्थ मागणी मान्य करण्यात आली असून २५ टक्के निधी देण्यात आला आहे.
यात वरोरा तालुक्यातील तुळाना, करंजी, सोईट, बोरी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी तसाहिलदार गोसावी व इतर अधिकारी उपस्थित होते.
या निधीमुळे जिल्ह्यातील देखील अनेक गावाच्या चेहरा बदललेला भविष्यात दिसणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून भविष्यात लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.