74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृद्धाश्रमात फळ व मिठाईचे वाटप

0
48
Advertisements

चंद्रपूर – भारत देशाच्या 74व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीने डेबू सावली वृद्धाश्रमात जाऊन फळ व मिठाईचे वाटप केले.
यावेळी पार्टीचे विदर्भ प्रमुख शेखर तावाडे देशाला गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्यांना आदरांजली वाहत, सीमेवर 24 तास देशाचे रक्षण करणाऱ्या लष्करातील जवानांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डी.एस. माथने यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, वृद्धाश्रमात त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेत वेळोवेळी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीतर्फे मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले, कार्यक्रमाचं संचालन धनंजय तावाडे तर संचालन व्यवस्थापिका सुमित्रा आवळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here