गडचांदूर येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी

0
176
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेले आणि औद्योगिक शहराच्या नावाने प्रसिद्धी प्राप्त गडचांदूर शहरात उपजिल्हा रुग्णालय देण्याची मागणी नगरपरिषद विरोधी पक्ष शिवसेना गटनेता सागर ठाकूरवार यांनी एका शिष्टमंडळाद्वारे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
गडचांदूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची माणिकगड सिमेंट कंपनी तसेच जवळच अंबुजा,अल्ट्राटेक,मुरली एग्रो (दालमीया)तथा कोळसा खाणी आहे.परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे याठिकाणी उपजिल्हा रुग्णालय नसून ग्रामीण रुग्णालय आहे.खेदाची बाब म्हणजे याठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही.एक्सरे,ईसीजी,सोनोग्राफी मशीन व आवश्यक असली इत्यादी सामग्री नाही.अधिकारी व कर्मचार्‍यांचा पुरेपूर स्टॉफ नाही.काही अपघात घडल्यास कोणतीही सुविधा नाही.गरोदर मतासाठी सोय नाही.अशा महत्वाच्या सुविधा नसल्याने आजतागायत कित्येक निष्पाप जिव गेले असून भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.राज्यात शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून मुख्यमंत्री व सहकारी मंत्र्यांवर जनतेचा विश्वास असल्याने आपण या सर्व बाबींचा विचार करून गडचांदूरातील ग्रामीण रुग्णालय ऐवजी सर्व सुविधा उपलब्ध करावी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्रदान करावे अशी मागणी वजा विनंती निवेदनातून केली आहे.यावेळी ठाकूरवार सह नगरसेवक धनंजय छाजेड, प्रणीत अहिरकर इतरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here