चंद्रपूरातून उत्तम अधिकारी घडावेत – आ. किशोर जोरगेवार

0
79
Advertisements

चंद्रपूर –  चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात कौतूकास्पद कामगीरी करत असून जिल्हाचे नाव लौकीक करत आहे. दिवसागणीक येथील विद्यार्थी उंच भरारी घेत आहे. हि जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. आता विपरीत परिस्थितीत युपीएससी आणि एमपीएससीच्या परिक्षेतही येथील विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेत इतर विद्यार्थ्यांनी युपीएससी आणि एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करावी असे आवाहण करत येत्या काळात चंद्रपूरातून उत्तम अधिकारी घडावेत अशी आशा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी विभागाच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात युपीएससी व एमपीएससी परिक्षत उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेचे प्रमूख अजय दुर्गे, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, संघटक, राजू जोशी कलाकार मल्लारप, विश्वजित शाहा राहुल मोहुर्ले आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना ते म्हणाले कि, ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असतांना पराजयाची पर्वा करायची नसते पराजयाने खचून न जाता ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन यशासाठी संघर्ष केल्यास यशप्रप्ती नक्की होईल संघर्ष हाच यशाचा यशस्वी मार्ग आहे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमात युपीएससी व एमपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आजचा हा सत्कार कार्यक्रम या विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नातून मिळवलेल्या यशा करिता व त्याच बरोबर या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरीता आहे. या परिक्षेत यश संपादण करण्यासाठी एकाग्रता व जिद्दीची गरज असते. मात्र याच बरोबर याला संघर्षाची जोड द्यावी लागते. संघर्षातून कोणतीही असाधारण गोष्टी सहज प्राप्त करता येते.  संघर्षात अनेक अपयश येतात मात्र अपयशातून खचून न जाता नेहमी प्रयत्न सूरु ठेवले पाहिजे विद्यार्थ्यांनीही ध्येय निश्चित करुन त्याच्या प्राप्तीसाठी संघर्ष करावा असे आवाहणही यावेळी आ. जोरगेवार यांनी  केले. एकादे ध्येय निश्चित करुन त्यांच्या प्राप्तीसाठी खुनगाठ बांधायला हवी मी ठरवले म्हणूनच आज आमदार आहे. गरिबीमूळे शिक्षण सुटले असे अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात म्हणून गरिबीमूळे कोणाचेही शिक्षण सुटनार नाही या दिशेने माझे पर्यत्न सुरु आहे. इयत्ता १० आणि १२ विच्या परिक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्याच्या पुणे येथे शिक्षणाचा पुर्ण खर्च मी आणि तेथील एका संस्थेच्या माध्यमातून केल्या जात आहे. गरिबांची मुलेच इतिहास घडवितात हा आजवरचा अनुभव आहे. स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधवा असे आवाहणही त्यांनी या प्रसंगी केले. स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेच्या वतीने दरवर्षी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. तसेच यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अधिकारी म्हणून उत्तम काम करत जिल्हाच नाव लौकीक करावे पण हे करत असतांना आपल्या मातीची नाळ विसरु नये असे आवाहणही केले. यावेळी त्यांनी  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.
यावेळी सहाय्यक कमांडन सिएपीएफ युपीएससी या परिक्षेत उत्तीण झालेला सुरज रामटेके,  उपनिरिक्षक राज्य उत्पादन शुल्क परिक्षेत अनुसुचित वर्गातून राज्यात प्रथम आलेला संघर्ष मेश्राम, उपनिरिक्षक राज्य उत्पादन शुल्क परिक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यातून दृतीय आलेला सुरेंद्र बुटले, आणि पोलिस उपनिरिक्षक म्हणून उर्त्तीण झालेला लक्ष्मीकांत दुर्गे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रामच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेचे मोंटो मानकर, आकाश माशीरकर, स्वप्नील तेलसे, कूणाल उराडे, निशांत मेश्राम, सतिश आवारी, शितिज नगराळे, हिमांशू जांगळेकर, शाहिद खान, शंकर लाटेलवार, भूपेंद्र फुलझेले, साहिल समुद, प्रदिप दासलवार, विनोद सुदित, ललीत देवरे, सुजान जांगळेकर, गितेश गुरले, प्रमोद भूरसे, विधान जांगळेकर, कोमोलीका खोब्रागडे, राजश्री देशमूख, ममता पानेम, संजना पानेम आदिंची अथक प्रयत्न केले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here