प्रियदर्शनी विद्यालय रामपूर येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
64
Advertisements

राजुरा : विद्या शिक्षण प्रसारकं मंडळ संचालित प्रियदर्शनी विद्यालय रामपूर (आर्वी) येथे स्वतंत्र दिनानिमित्य माजी आमदार तथा विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शनजी निमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता १० वी मधिल गुणवंत विद्यार्थी हर्षित वडीचार (८५.२०%) राणी पारखी (८४.४०) चैतन्य आस्वले (८२.६०) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वि. मा. शि. संघाचे जिल्हाध्यक्ष केशवरावजी ठाकरे, रामपूर येथील सरपंच वंदनाताई गौरकार, उपसरपंच हेमलताताई ताकसांडे, सदस्य अजय सकिनाला, रमेश झाडे, जगदीश बुटले, विलास कोदिरपाल, सुनीता उरकुडे, अनिता आडे, ग्रामविकास अधिकारी अमर्दिप खोडके, माजी सरपंच उज्वल शेंडे, सतीश चौधरी, मुख्याध्यापक मनोज पावडे, शाळेतील शिक्षक नितीन ठाकरे, महेंद्र मंदे, ममता नंदुरकर, श्रीकृष्ण गोरे, अभय बोभाटे, निलोफर खान, इंद्रजित वाघमारे, सतीश पेटकर व पालक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here