Advertisements
विसापूर – आज देशात 74 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा करण्यात येत आहे, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहणानंतर विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांच्या हस्ते करण्यात आले, सोलापन यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे सचिव अनिल देठे, पत्रकार संघाचे सचिव विनोद पन्नासे, उत्तम गोमासे, नरेश मेश्राम, अजय साव, मिलिंद पुणेकर, मुख्याध्यापिका सौ. वैशाली मेश्राम, सौ. शुभांगी दुपारे व सौ. ठमके उपस्थित होते.