चंद्रपूर मनपा राबविणार ‘टार्गेट झिरो’ मोहीम

0
85
Advertisements

चंद्रपूर  – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. चंद्रपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या फार मोठी आहे. हीच साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका आता ‘ टार्गेट झिरो ( Target Zero) ’ ही संकल्पना राबवणार आहे.
मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार, मा. आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सदर मोहीम राबविली जाणार असून, टार्गेट झिरो अंतर्गत लवकरात लवकर रुग्णाची ओळख, तातडीने अलगीकरण व तात्काळ उपचार हीच त्रिसूत्री या मोहिमेत राबविली जाणार आहे. रुग्णाची ओळख लवकर झाल्याने त्याचे तातडीने अलगीकरण करण्यात येईल ज्यायोगे इतरांना बाधा होऊ नये व त्यानंतर रुग्णावर तात्काळ उपचार केल्याने मृत्यूदर कमी होईल.
याकरीता अँटीजन चाचण्यांची संख्या वाढविणे तसेच रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढविणे आवश्यक आहे.  मनपातर्फे १५० बेड असलेले नवीन कोव्हीड केअर सेंटर वन अकादमी येथे सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी वन अकादमी १ व २ येथे असणारे कोव्हीड केअर सेंटर आता इमारत क्र. ३ मधेही सुरु करण्यात आल्याने अधिक रुग्णांचे उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच लवकरच नवीन अँटीजन चाचणी सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

सध्या शहरात एकुण २५० ते ३०० अँटीजन चाचण्या दररोज करण्यात येत आहेत. चाचण्यांची संख्या वाढली असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. अँटीजन चाचणीद्वारे कोरोना हॉटस्पॉट किंवा प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये तसेच अति जोखमीच्या आणि कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांची चाचणी करुन तातडीने बाधा निश्चिती करण्यात येते. या चाचणीचा परिणाम हा १५ ते ३० मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होत आहे.
यासोबतच कंटेनमेंट झोनमधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची गती वाढविन्यावर भर देण्यात येणार आहे.
शहरात कोरोनाला अटकाव करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांवर, कोमॉर्बीड रुग्णांवर उपचार करण्यास भर देण्यात येतो आहे. त्यामुळे रुग्ण वाढण्याचा कालावधी आणि मृत्यूचा दर कमी होण्यास मदत होईल.  यासंदर्भातील अहवाल मा. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांद्वारे रोजच घेण्यात येतो. “टार्गेट झिरो” या संकल्पनेमुळे शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत नक्कीच काही प्रमाणात घट होवू शकते.

Advertisements

#chandrapur municipal corporation target zero

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here