गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरातील कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक जागा,शासकीय कार्यालय, शौचालयांची निगा न राखता शहराला स्वच्छ सुंदर शहरांचा दर्जा प्राप्ती मुकविणार्या “युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित” या संस्थेने शासनाची फसवणूक करीत नागरिकांची दिशाभूल केल्याचे चित्र असून अशा संस्थेला न.प.ने काळ्या यादीत टाकावे अशी मागणी भीम आर्मी उपजिल्हा प्रमुख मदन बोरकर यांनी गेल्या 15 दिवसापुर्वी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली.मात्र याविषयी शासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई तर सोडाच साधी चौकशी सुद्धा केलीली नसून नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी यांना माझी नम्र विनंती आहे की,सदर घोटाळ्याकडे जातीने लक्ष देऊन चौकशी करावी दोषी आढळल्यास संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकावे आणि या घोटाळ्याला जबाबदार दोषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.असे मत वजा विनंती News34 च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
गडचांदूरातील घनकचरा महाघोटाळा, चौकशी मात्र थंडबसत्यात
Advertisements