गडचांदूर प्रमाणेच कोरपन्यात ही घनकचरा व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ

0
78
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना ग्रामपंचयतला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 14 वित्त आयोग निधीतून घनकचरा व्यवस्थापनचे काम सलग 3 वर्षांपासून ठेकेदाराच्या माध्यमातून केले जात आहे.गडचांदूर प्रमाणेच कोरपना येथे ही शासनाने नमूद केलेल्या करार व अटींना बगल देत सदर कामात मोठा गैरव्यवहार होत असून कामगारांना किमान वेतन न देता अल्पशे वेतन देऊन त्यांचे शोषण केले जात आहे.घनकचरा व्यवस्थापन कामाच्या माध्यमातून नाली सफाई,स्वच्छता व ओला-सुका कचरा एकत्र करून खत निर्मिती आदी कामांचा समावेश असतानाही संबंधीत ठेकेदारांकडून योग्यरीत्या काम होत नसल्याने कोरपना येथे घंटागाडी चालकांना महिन्याला फक्त 3 हजार 500 रूपये देऊन त्यांचे शोषण केले जात असल्याने किमान वेतनाची पायमली होत आहे.करारनामा प्रमाणे कोरपना येथे 10 घंटागाडी असताना केवळ 6 गाडींचा उपयोग केला जात आहे.त्यामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.कित्येक प्रभागात नाल्या घाणीने भरल्या असून उपसा करण्यात आला नसून सार्वजनिक जागेवर घाणीचे साम्राज्य दिसत आहे.परंतु यासंदर्भात अनेक तक्रारी होऊनही नगर प्रशासनाकडून कोणतीच दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पहायला मिळत आहे.घनकचरा व्यवस्थापन कामावरील मजुरांना कमी वेतन देऊन त्यांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचे चित्र दोन्ही ठिकाणी दिसत आहे.कोरपना बाबतीत म्हणायचे झालेच तर याठिकाणी नगराध्यक्षाचा मुलगाच घंटागाडीवर शहराचा कचरा गोळा करत आहे त्याला ही कमी वेतन दिले जात असल्याची माहिती आहे.ही बाब माहीत असूनही कोरपन्याच्या नगराध्यक्षा गप्प का?असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.एकीकडे इतर नगरपरिषद,नगरपंचायत स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत भाग घेऊन पुरस्काराने सन्मानित होत आहे तर दुसरीकडे या दोन्ही ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनच्या कामात गैरव्यवहार करून नाव बदनाम करीत आहे.या कामात शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहे हे तेवढेच खरे.संबधीत ठेकेदारांनी करारनामा प्रमाणे वेतन न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक अमोल आसेकर,सुहेल अली,सुभाष तुराणकार,रेखा चन्ने यांनी दिला आहे.पहा कोरपना येथील सफाई कामगारांची व्यथा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here