कोरोना योद्धांचं वेतनासाठी कामबंद आंदोलन, वेतनाच्या नावावर कंत्राटी कामगारांना फक्त जुमला

0
103
Advertisements

चंद्रपूर – मागील 5 महिन्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना वेतन नाही, त्यामुळे आम्ही आपलं आयुष्य जगायचं कस हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

शहरातील राजकीय पदाधिकारी कंत्राटी कामगारांच वेतन मिळवून देतो हा त्यांचा प्रकार म्हणजे फक्त आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी असतो.

Advertisements

आज तब्बल 500 कंत्राटी कामगार मागील 5 महिन्यापासून वेतनाविणा वैधकिय महाविद्यालयात आपली निःशुल्क सेवा देत आहे, याच भान तरी सरकारने ठेवायला हवं, जिल्ह्यात आज दमखम असणारे पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर,  आमदार जोरगेवार सारखे जनप्रतिनिधी असताना सुद्धा कामगारांवर आज अन्याय होत आहे.

काही दिवसांपूर्वीच कंत्राटी कामगार महिला पाटील यांचा रुग्णालयात काम करीत असताना मृत्यू झाला, त्यानंतर सुद्धा या कुंभकर्णी प्रशासनाला जाग आला नाही, भाजप शहर अध्यक्ष डॉ गुलवाडे यांना कंत्राटी कामगारांचा मुद्दा राजकीय पदावर आल्यावर कळला, नंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत कामगारांचे पगार व्हावे यासाठी निवेदन दिले, कक्षसेवकाना 2 वेतन मिळाले ते सुद्धा 1 हजार ते 3 हजारांच्या घरातच म्हणजे 5 महिन्याच्या वेतनाचे स्वप्न दाखवून 2 महिन्याचा वेतन तो सुद्धा कपात करून म्हणजे कामगारांसोबत प्रशासनाचा हा हेकेखोरपणा झाला.

सध्या सर्व कामगारांसोबत जनविकास सेना पूर्ण ताकदीने उभी आहे, कोरोना काळात कंत्राटी कामगारांना कसल्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नाही त्यानंतर पण ते आपली सेवा देत आहे.

परंतु कितिदिवस निःशुल्क काम करणार यासाठी आता कामगारांना पूर्ण 5 महिन्याचे वेतन देण्यात यावे अन्यथा हे आंदोलन असेच सुरू राहणार असा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here